• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Merit-Cum-Means

Last updated on July 6th, 2023 at 11:17 am

गुणवत्ता-नि-साधन शिष्यवृत्ती योजना ( Merit-Cum-Means )

अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली तर्फे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता -नि – साधन शिष्यवृत्ती योजना सन 2007-08 पासून सुरू केलेली आहे. सदर योजना मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी आणि जैन या अल्पसंख्यांक समाजातील व्यावसायिक अभ्यासक्रमां मध्ये (पदवी व पदव्युत्तर ) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता लागू करण्यात आलेली आहे.सदर योजने करीता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (दोन्ही पालकांचे एकत्रित ) रुपये 2.50 लाखापर्यंत निश्चित करण्यात आलेले आहे.सदर योजनासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांना नोडल ऑफिस म्हणून घोषित करण्यात आले आहे.
शिष्यवृत्तीचा नविन ( Fresh ) संच/कोटा (Quota) –
धर्मनिहायनविन  ( Fresh ) शिष्यववृत्तीचासंच/कोटा
धर्म मुस्लीम बौध्द ख्रिश्चन शिख पारशी जैन एकूण
विदयार्थ्यीसंख्या 3328 1676 277 57 12 359 5709
शिष्यवृत्तीरक्कम- सदर योजनेंतर्गत नविन शिष्यवृत्ती व नूतनी करणासाठी आलेल्या पात्र विद्यार्थ्यांला खालील प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.
Sr.No. Type of Financial Assistance Rate for Hostler Rate for Day Scholar
1. Maintenance Allowance (For 10 months only) Rs.10,000/-per annum ( Rs.1000 p.m.) Rs.5,000/- per annum. ( Rs.500 p.m.)
2. Course Fee* Rs.20,000/- per annum or Actual whichever is less Rs.20,000/- per annum or Actual whichever is less
Total   Rs.30,000/- Rs.25,000/-
* Full course fee will be reimbursed for eligible institutions listed at Annexure‐III .

सदर योजनांची मंजुर रक्कम केंद्र शासना कडून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्या मध्ये Direct Benefit Transfer (DBT) अंतर्गत जमा करण्यात येते.
सदर योजनांची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाच्या संकेतस्थळ www.minorityaffairs.gov.in) /केंद्र शासनाच्या National Scholarship Portal ( NSP ) पोर्टल (संकेतस्थळ- www.scholarships.gov.in ) वर देण्यात आलेली आहे.
सदर योजना केंद्र शासनाच्या National Scholarship Portal ( NSP ) पोर्टलद्वारे ( संकेतस्थळ www.scholarships.gov.in ) ऑनलाईनरित्या राबविण्यात येते. सदर योजनेच्या लाभासाठी चालू शैक्षणिक वर्षा मध्ये प्रथम वर्ष व थेट व्दितीय वर्षात नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांनी नवीन ( Fresh ) व मागील शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या पात्र विद्यार्थ्यानी नुतनीकरणासाठी ( Renewal ) अर्ज NSP पोर्टलवर नमूद करण्यात आलेल्या अंतिम मुदतीच्या आत ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.