• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojna

Last updated on July 6th, 2023 at 11:04 am

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय, शासन अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये/ शासकीय विद्यापीठे व त्या विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील (खाजगी अभिमत विद्यापीठे/ स्वयं अर्थसहाय्यित खाजगी विद्यापीठे वगळून) मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेव्दारे ( व्यवस्थापन कोटयातील / संस्था स्तरांवरील प्रवेश वगळून ) प्रवेशित ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्प-भूधारक शेतकरी / नोंदणीकृत मजूर / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी  लागू केली आहे.. अशा विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना” ( Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojna)” लागू केली आहे.

.

निर्वाहभत्याचीरक्कम खालील प्रमाणे –

अ. क्र. प्रकार प्रवेशित अभ्यासक्रमाच्या संस्थेचे ठिकाण वार्षिक वसतिगृह निर्वाह भत्त्याची एकुण रक्कम (शैक्षणिक वर्षातील 10 महीन्या करिता) राज्याच्या प्रत्येक जिल्हया-साठीचा संच (Quota)
1.
ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर आहेत.
( मुंबई व पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे,औरंगाबाद,नागपूर )
रु. 30,000/-
सर्व पात्र विद्यार्थी
राज्यातील अन्य ठिकाणी
रु. 20,000/-
2.
आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी (कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा-1 लाखपर्यंत)
( मुंबई व पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे,औरंगाबाद,नागपूर )
रु. 10,000/-
सर्व पात्र विद्यार्थी
राज्यातील अन्य ठिकाणी
रु. 8,000/-
3.
आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी (कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा-1 लाखा पुढे ते 8लाखपर्यंत )
( मुंबई व पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे,औरंगाबाद,नागपूर )
रु. 10,000/-
(500 पर्यंत मर्यादित 33 टक्के महिलां-करिता राखीव अभ्यासक्रमनिहाय गुणवत्तेनुसार)
राज्यातील अन्य ठिकाणी
रु. 8,000/-

सदर योजनांची मंजुर रक्कम विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये डीबीटी पोर्टलद्वारे जमाकरण्यातयेते.
सन 2018-19पासुन सदर योजना शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे ( संकेतस्थळ – mahadbtmahait.gov.in) राबविण्यात येते.