• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Desk 17

Last updated on ऑक्टोबर 12th, 2023 at 12:56 pm

कार्यासन १७ टीईक्यू आयपी

कार्यासन क्रमांक १७
नियंत्रक अधिकारी
डॉ. सुनिल भामरे, सहसंचालक
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव
डॉ.ए.बी.नांदगावकर, वि.का.अ.
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम
श्री.न.भा.पाटील सिस्टिम ॲनॅलििस्ट
विषयसूची - कामकाज
TEQUIP / MERIT PRAKALP / NEP

१. प्रकल्प विभाग संस्थाची पात्रता ठरविण्यासाठी जबाबदार असेल, संस्थांचे नेटवर्क क्लस्टर्स तयार करणे, लीड व नेटवर्क संस्थांच्या संयुक्त प्रस्तावांचा विकास करणे, नेटवर्कचे कार्य यशस्वीरित्या पार पाडणे, संस्थांवर देखरेख ठेवणे, धोरणात्मक सुधारणा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे. संस्था स्तरावर प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी देखरेख ठेवणे.
२. गुणवत्ता हमी विभाग व बाहय यंत्रणेमार्फत गुणवत्तेचे मुल्यमापन करणे.
३. एनईपी - 2020 ची अंमलबजावणीबाबत कार्यवाही करणे.
४. निधीचे व्यवस्थापन करणे (टीक्युप निधी)
५. वैधानिक लेखा परिक्षण करुन घेणे. (टीक्युप)
६. प्रतिपुर्ती दाव्याबाबत कार्यवाही करणे.
७. सेंटर ऑफ एक्सलंस बाबतची कार्यवाही करणे.
समन्वय विकासाची कार्यक्रम राबविणे (I I I Cell)

१. देशी विदेशी सेवा मिळविणे या बाबंीविषयी मार्गदर्शन करणे.
२. तंत्रशिक्षणाच्या विकासाबाबत उद्योंगधंद्यांच्या संघटनांशी समन्वय साधणे, सामंजस्य करार करणे.
३. उद्योंगधंद्यांच्या गरजेनुसार मनुष्य बळाच्या निर्मीतीसाठी अभ्यासक्रमात सुधारणा करण्याबाबतची कार्यवाही करणे.
४. अध्यापक/कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, सतत शिक्षण (continueing Education) कार्यक्रम राबविणे
५. पदवी व पदविका धारकांना उद्योग धंद्यामधून प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही करणे
क्वालिटी मॅनेजमेंट सेल

१. राज्यातील सर्व तंत्रशिक्षण संस्थांचे ॲक्रिडिटेशन करुन घेण्याची कार्यवाही करणे.
२. राज्यातील शासकीय पदवी संस्थामध्ये Incubation Centre स्थापन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे.
३. उद्योगधंदे व संस्था समन्वय वाढविण्याच्या दृष्टीने सी.आय.आय./आय.एम.सी./एफ.आय.सी.सी.आय. इत्यादी संघटनांशी समन्वय साधून सामंजस्य करार करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे.
४. राज्यातील विविध संस्थांमधील तंत्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विविध चर्चासत्र, कार्यशाळा तसेच सेमिनार यांचे आयोजन करणे.
५. संस्थांमध्ये संशोधन वाढविण्यासाठी प्रयत्न, प्रोत्साहनपर योजना राबविणे.
6.विविध अभ्यासक्रमांचे नुतनीकरण/सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करणे व त्यासाठी शिक्षकांचे कर्मचा-यांचे प्रशिक्षण आयोजित करणे ( यशदा /NITTTR / MSFDA ) , संचालनालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण .
7.संचालनालयाचे News Letter & E- brouchers प्रकाशित करणे.