• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Desk 12

Last updated on ऑक्टोबर 11th, 2023 at 04:12 pm

कार्यासन १२

कार्यासन क्रमांक १२
नियंत्रक अधिकारी
डॉ. सुनिल भामरे, सहसंचालक
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव
श्री. महेंद्र दवणे, उपसंचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम
श्री. अतुल हरके रचना व कार्यपध्दती अधिकारी
विषयसूची - कामकाज
मुख्य कार्यालयातील वर्ग-3 व 4 कर्मचा-यांची आस्थापना व प्रशासकीय बाबी.

१. मुख्य कार्यालयातील वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांच्या हजेरीची नोंद ठेवणे तसेच सर्व कर्मचा-यांवर नियंत्रण ठेवणे.
२. मुख्य कार्यालय तसेच शासकीय तथा अशासकीय अनुदानित पदवी व पदविका संस्था, तंत्रशिक्षण मंडळ, सर्व विभागीय कार्यालयातील वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांची आस्थापनाविषयक कामे.
३. बृहनमुंबई कार्यालय/संस्थेतील वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांच्या रजामंजुरीस मान्यता देणे.
४. संचालनालयातील वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची वेतनआयोगानुसार वेतननिश्चिती करणे.
५. राज्य स्तरावरील वर्ग- 3 च्या पदावर नियुक्ती/पदोन्नती बाबत कार्यवाही करणे.
६. बृहन्मुंबईतील तसेच संचालनालयातील गट क व ड मधील कर्मचा-यांच्या जेष्ठता यादया प्रसिध्द करणे.
७. राज्यस्तरीय वर्ग-3 पदांच्या जेष्ठता याद्या, परिविक्षा कालावधी, बिंदूनामावली वहया, भरती, बढती व इतर अनुषंगिक कामकाज.
८. कालबध्द पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना, आगाऊ वेतनवाढी मंजूर करणे.
९. अधिकारी / कर्मचाऱ्यांना ओळखपत्र पुरविणे.
१०. बृहन्मुंबईतील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या राहात्या घराबाबतची आवेदन पत्रे शासनाच्या मंजुरीस्तव पाठविणे व तत्संबंधी पुढील कार्यवाही करणे.
११. मुख्य कार्यालयातील व अधिनस्त विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या वर्ग-3 व 4 च्या कर्मचाऱ्यांची लोकआयुक्त प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे, मागासवर्ग आयोग, अपंग आयोग, मानवी हक्क आयोग येथे दाखल केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने दाखल केलेली प्रकरणे हाताळणे
१२. वर्ग-3 व 4 मधील कर्मचाऱ्यांच्या विभागीय बदल्या / विभागीय कार्यालयातील वर्ग-3 मधील कर्मचाऱ्यांच्या विभागांतर्गत बदल्या करणे व तद्अनुषंगीक प्रस्ताव शासनास मंजूरीस्तव सादर करणे.
१३. वर्ग-3 व वर्ग-4 चा कर्मचा-यांचा ईएमआयएस / डेटाबेस तयार करणे व अद्ययावत ठेवणे.
१४. मंत्रालयात प्रतिनियुक्तीने / मतदानाच्या कामासाठी / जनगणनेच्या कामासाठी / महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचेकडे परीक्षेच्या कामासाठी कर्मचारी उपलब्ध करुन देणे.
१५. मुख्य कार्यालयातील वर्ग-3 व 4 च्या कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल अद्ययावत ठेवणे.
१६. मुख्य कार्यालयातील दूरध्वनी / लघुलेखक / झेरॉक्स इ. कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
१७. वर्ग 3 व 4 मध्ये अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष समावेशानाची कार्यवाही करणे.
१८. शासकीय कार्यालयामधील वर्ग-3 व वर्ग-4 चे सेवाप्रवेश नियम आणि कर्तव्य व जबाबदा-या तयार करणे.
१९. संचालनालयातील तसेच शासकीय / अशासकीय अनुदानित संस्थांतील वर्ग-3 मधील कर्मचा-यांची मराठी/हिंदी भाषा परीक्षा सूट प्रकरणे हाताळणे.