• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Store Verification

Last updated on July 20th, 2022 at 03:38 pm

भांडार पडताळणी व लेखा आक्षेप विभाग

कार्यासन क्र.14 ची सांख्यिकीय माहिती पुढीलप्रमाणे आहे.

महालेखापाल, महालेखाकार कार्यालय मुंबई व नागपुर यांचेकडून या संचालनालयाच्या अधिपत्याखालील असलेले 6 विभागीय कार्यालये, 42 शासकीय तंत्रनिकेतने, 10 अभियांत्रिकी महाविदयालये, 1 वास्तुशास्त्र महाविदयालय, 4 औषधनिर्माणशास्त्र महाविदयालये, 2 हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी यांचे महालेखाकार कार्यालयामार्फत अंतर्गत लेखापरिक्षण करण्यात येते.
विभागीय भांडारपडताळणी पथक व महालेखाकार कार्यालयाने निर्देशित केलेले भांडार पडताळणी आक्षेप व लेखा आक्षेपाबाबत संबंधितांना मार्गदर्शन करणे, सदरचे आक्षेप निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करणे, शासन व महालेखाकार कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या लेखा समितीच्या बैठकीत जास्तीत जास्त आक्षेपाचा निपटारा करुन घेणे, या संचालनालयाचे राज्य वित्त अहवाल व विनियोजन लेखे अहवाल शासनास सादर करणे इ.कामे या कार्यासनाकडून केली जातात.

तंत्रशिक्षण संचालनालयाचे लेखा आक्षेप व भांडार आक्षेप यांची सदयस्थिती.

कार्यालयाचे नाव सन 2020-21 सन 2021-22
निकाली निघालेले लेखा आक्षेप
निकाली निघालेले भांडार आक्षेप
निकाली निघालेले लेखा आक्षेप
निकाली निघालेले भांडार आक्षेप
तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई
--
--
08
--
सर्व विभागीय कार्यालये
48
70
49
177
एकुण
48
70
57
177