विद्यार्थी विभाग [का. क्र. २ / २अ / ३ / १०]
विषय: पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम (शैक्षणिक प्रशासन)
- अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड कॅटरींग टेक्नॉलॉजी, व्यवस्थापनशास्त्र, एमसीए व अभिकल्प इत्यादी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या मान्यतेच्या अनुषंगाने कार्यवाही करणे.
- विनाअनुदानित संस्थामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबीं संदर्भात प्राप्त तक्रार अर्जाच्या अनुषंगाने पुढील उचित कार्यवाहीकरीता संबंधित समुचित प्राधिकरणाकडे तक्रार अर्ज अग्रेषित करणे व तदअनुषंगिक कार्यवाही करणे.
- शासकीय व शासन अनुदानित पदवी व पदव्युत्तर संस्थांच्या शिक्षण शुल्क निर्धारित करण्यासाठी शासनास प्रस्ताव पाठविणे.
- अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड कॅटरींग टेक्नॉलॉजी, व्यवस्थापनशास्त्र, एमसीए व अभिकल्प इ. च्या मान्यतेशी निगडीत न्यायालयीन प्रकरणे हाताळणे
- अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र आणि हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड कॅटरींग टेक्नॉलॉजी पदवी संस्थांमधील विद्यार्थ्यांचे संस्था बदल, विद्यापीठ बदलासह संस्था बदल इत्यादी प्रकरणांवर कार्यवाही करणे.
- अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड कॅटरींग टेक्नॉलॉजी, व्यवस्थापनशास्त्र, एमसीए व अभिकल्प अभ्यासक्रम चालविणा-या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अनधिकृत संस्थाबाबत प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करणे.
- शाकीय अभियांत्रिकी / औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकासनिधी मधून संस्थांच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे.