• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

User menu

Director’S Desk

Last updated on जुलै 9th, 2026 at 12:58 pm

संचालकांचा संदेश

Dr Pramod Naik Director

राज्यातील तंत्रशिक्षण संचालनालयाच्या व्यवस्थेच्या गुणवत्तापूर्ण, पारदर्शक, उत्तरदायी आणि दूरदृष्टीपूर्ण विकासासाठी संचालनालयाकडून सातत्याने महत्त्वपूर्ण करण्यात येत आहे.

आजच्या ज्ञानाधिष्ठित आणि तंत्रज्ञानप्रधान युगात तंत्रशिक्षण हे केवळ रोजगाराभिमुख शिक्षण नसून नवोन्मेष, संशोधन, कौशल्यविकास, उद्योजकता, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रीय विकासाचा मजबूत पाया आहे. विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक, तांत्रिकदृष्ट्या सक्षम, मूल्याधिष्ठित आणि उद्योगाभिमुख बनविण्यासाठी गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक आणि परिणामाभिमुख शैक्षणिक व्यवस्था विकसित करणे हे संचालनालयाचे प्रमुख ध्येय आहे.

तंत्रशिक्षण क्षेत्रात डिजिटल परिवर्तन, ई-शासन, शैक्षणिक गुणवत्तावृद्धी, उद्योग-संस्था सहकार्य, संशोधन व नवोन्मेषाला प्रोत्साहन, प्राध्यापक क्षमता विकास, कौशल्यवृद्धी, पारदर्शक प्रवेश प्रक्रिया आणि नागरिकाभिमुख सेवा वितरण यांना अधिक प्रभावी करण्यासाठी संचालनालय कटिबद्ध आहे. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून कार्यक्षम, पारदर्शक, उत्तरदायी आणि सुलभ प्रशासनाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहे.

हे संकेतस्थळ विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षण संस्था, उद्योग क्षेत्र आणि सर्व संबंधित घटकांसाठी शासनाच्या योजना, धोरणे, अधिसूचना, ऑनलाइन सेवा आणि विविध उपक्रमांची विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देणारे प्रभावी व्यासपीठ आहे. या माध्यमातून अधिक परिणामकारक, सुलभ आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

राज्यातील तंत्रशिक्षणाच्या प्रगतीसाठी योगदान देणारे सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षण संस्था, प्राध्यापक, विद्यार्थी, उद्योग क्षेत्र आणि सर्व हितधारक यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण अधिक सक्षम, नवोन्मेषी, जागतिक दर्जाचे आणि भविष्याभिमुख करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे कार्य करूया.

 

राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण संस्था आणि नागरिकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या विधायक सूचना, सहकार्य आणि सक्रिय सहभागाचे सदैव स्वागत आहे.

डॉ. प्रमोद नाईक,
प्र. संचालक,
तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य