• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

User menu

Foreign Scholarship 2019

Last updated on जून 18th, 2026 at 04:42 pm

“खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गुणवंत मुलामुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती"

  • उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून दि. 04.10.2018 च्या शासन निर्णयानुसार “गुणवंत मुला मुलींना परदेशांत उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती” या नावाने परदेशी शिष्यवृत्तीची योजना सन 2018-19 ते सन 2025-26 पर्यंत राबविण्यात आली. आता शासनाच्या दि. 10.06.2026 च्या शासन निर्णयान्वये “खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गुणवंत मुलामुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती” या नावाने योजना राबविण्यात येत असून तंत्र शिक्षण संचालनालयाच्या https://dte.maharashtra.gov.in/ या वेब साईटवरील Foreign Scholarship Portal वर विद्यार्थ्यांनी Online पध्दतीने प्रतिवर्षी विहीत मुदतीत अर्ज करण्याची सुविधा देण्यात येते. तसेच विहीत मुदत जाहिरातीनुसार तथा संकेतस्थळावर प्रतिवर्षी नमुद करण्यात येते.

 

पात्रता:

१.विद्यार्थी व विद्यार्थ्याचे आई वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावेत.

२.शैक्षणिक अर्हता परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत तंत्र शिक्षण संचालनालय व उच्च शिक्षण संचालनालय आणि कला संचालनालयाच्या अखत्यारीतील अभ्यासक्रम किमान ५५% गुणांसहीत पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

३. विद्यार्थ्याला परदेशातील QS (Quacquarelli Symonds) अ‌द्यावत वर्ल्ड रॅन्कींगमध्ये २०० च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्था / वि‌द्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश मिळालेला असावा.

  • वर नमूद केल्याप्रमाणे परदेशातील शैक्षणिक संस्थेचे Unconditional Offer Letter.
  • वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु.८ लाखापेक्षा कमी असावे.
  • प्रवेश वर्षाच्या दिनांक १ जुलै रोजी उमेदवारांचे वय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ३० वर्ष पेक्षा जास्त नसावे.

 

४. या योजनेकरीता पीएच.डी अभ्यासक्रमाचे अर्ज प्राप्त झाल्यास, अश्या विद्यार्थ्यांना प्रायोजकत्व (Sponsorship) न मिळाल्याची खात्री करून त्यांचा विचार करण्यात येईल.

अ. क्र. शाखा / अभ्यासक्रम पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका
1.
कला
०३
2.
वाणिज्य
०३
3.
विज्ञान
०५
व्यवस्थापन
०४
5
विधी अभ्यासक्रम
०३
6
अभियांत्रिकी/तंत्रज्ञान
१५
वास्तुकला शास्त्र
०३
औषध निर्माण शास्त्र
०४
एकूण
४०

विद्यार्थ्यांस मिळणारे लाभ :

  • विद्यापीठाने नमूद केलेले संपूर्ण शिक्षण शुल्क (Tuition Fee)
  • वैयक्तिक आरोग्य विम्याची पूर्ण रक्कम
  • शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार संपूर्ण शैक्षणिक कालावधीकरीता निर्वाह भत्ता ( U.K. साठी GBP 9900 व U.K. सोडून इतर सर्व देशांसाठी USD 15400 प्रति वर्षी) व आकस्मिक खर्च भत्ता (U.K. साठी GBP 1100 व U.K. सोडून इतर सर्व देशांसाठी USD 1500 प्रति वर्षी)
  • सर्वात जवळच्या मार्गाने येण्या-जाण्याचा इकॉनॉमी क्लॉसचा विमान प्रवास खर्च (केवळ एकदाच) 

हेल्पलाईन नंबर:

(सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० पर्यंत)

  • ०२२-६८५९७४९६/४२१