• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Foreign Scholarship 2019

Last updated on ऑगस्ट 12th, 2024 at 11:06 am

खुल्या प्रवर्गातील “गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती"

  • उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक ०४ ऑक्टोबर, २०१८ च्या शासन निर्णयान्वये खुल्या प्रवर्गातील “गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती” सुरु करण्यांत आली असून शासन शुध्दीपत्रक उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक शिष्यवृ-2024 /प्र. क्र.243/तांशि-4, दि.06 ऑगस्ट 2024 च्या सुधारित निकषाप्रमाणे राबवली जाते.
  • या शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून तंत्र शिक्षण संचालनालयाच्या https://dte.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील Foreign Scholarships Portal या पोर्टलवरुन दरवर्षी online पद्धतीने अर्ज मागविण्यात येतात.
पात्रता :
  • विद्यार्थी व विद्यार्थ्याचे आई / वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावेत.
  • शैक्षणिक अर्हता परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठांमधून किमान ५५ टक्के गुणांसहीत पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच पीएच.डी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठांमधून किमान ५५ टक्के गुणांसहीत पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • विद्यार्थ्याला परदेशातील QS (Quacquarelli Symonds) अद्ययावत वर्ल्ड रॅन्कींगमध्ये 200 च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्था / विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश मिळालेला असावा.
  • वर नमूद केल्याप्रमाणे परदेशातील शैक्षणिक संस्थेचे Unconditional Offer Letter.
  • वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 8 लाखापेक्षा कमी.
  • दिनांक 1 जुलै 2024 रोजी उमेदवारांचे वय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी 40 वर्ष पेक्षा जास्त नसावे.
सदरची योजना शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून राबविण्यात आली असून आता शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक बैठक-2022/प्र.क्र.188/तांशि-4, दि.31 जुलै, 2023 अन्वये या शिष्यवृत्तीच्या पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका जागांच्या संख्येत वाढ झालेली असल्यामुळे शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून खालीलप्रमाणे शाखा / अभ्यासक्रम निहाय जागा उपलब्ध असतील
अ. क्र. शाखा / अभ्यासक्रम पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका डॉक्टरेट एकूण
1.
कला
०३
०१
०४
2.
वाणिज्य
०३
०१
०४
3.
विज्ञान
०३
०१
०४
व्यवस्थापन
०३
०१
०४
5
विधी अभ्यासक्रम
०३
०१
०४
6
अभियांत्रिकी/वास्तुकला शास्त्र
१२
०४
१६
7
औषधनिर्माणशास्त्र
०३
०१
०४
एकूण
३०
१०
४०
विद्यार्थ्यांस मिळणारे लाभ :
  • विद्यापीठाने नमूद केलेले संपूर्ण शिक्षण शुल्क (Tuition Fee).
  • वैयक्तिक आरोग्य विम्याची पूर्ण रक्कम.
  • शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार संपूर्ण शैक्षणिक कालावधीकरीता निर्वाह भत्ता (U.K. साठी GBP 9900 व U.K. सोडून इतर सर्व देशांसाठी USD 15400).
  • यु.एस.ए. व इतर देशांसाठी (यु.के. वगळून) १५०० युएस डॉलर, आणि यु.के. साठी ११०० जीबीपी इतका निर्वाह भत्ता /इतर खर्च/ आकस्मिक खर्च.
  • केवळ एकदाच जवळच्या मार्गाने येण्या-जाण्याचा विमान प्रवास खर्च (इकॉनॉमी क्लास).
हेल्पलाईन नंबर : (सकाळी 10:00 ते सायंकाळी 06:00 पर्यंत)
  • 022-68597486/459/421