National Scholarship Scheme for Post Graduate Studies
Last updated on फेब्रुवारी 26th, 2026 at 11:39 am
पदव्युत्तर पदवी अभ्यासासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना
[UGC-National Scholarship for Post Graduate
Studies]
[UGC-National Scholarship for Post Graduate Studies]
विश्व विद्यालय अनुदान आयोग, शिक्षण मंत्रालय,नवी दिल्ली (UGC) यांनी वेळोवेळी निर्दिष्ट आणि अधिसूचित केलेल्या विद्यापीठ /महाविद्यालय /संस्थेमध्ये मान्यता प्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायिक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांकमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना” सुरु केली आहे. सदर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची वयोमर्यादा 30 वर्षांपेक्षा कमी निश्चित करण्यात आलेली आहे.
सन 2023-24 पासून सदर योजनेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांना नोडल ऑफिस म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून राष्ट्रासाठी खालीलप्रमाणे शिष्यवृत्तीचा संच निर्धारीत करण्यात आला आहे.
शिष्यवृत्तीचा नविन ( Fresh ) संच/कोटा ( Quota ) -
अ. क्र.
अभ्यासक्रम
संपूर्ण देशासाठी संच संख्या
1
पदव्युत्तर पदवी
10,000
शिष्यवृत्ती रक्कम -
सदर योजनेंतर्गत नविन शिष्यवृत्ती ( पात्र व गुणवत्तेनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ) व नूतनीकरणासाठी आलेल्या पात्र विद्यार्थ्यांला खालील प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.
अ. क्र.
शिष्यवृत्तीचे घटक
एक रक्कम ( Lump sum Amount )
अ
शिष्यवृत्ती
रु.1,50,000/- प्रति वर्ष
सदर योजनांची मंजुर रक्कम केंद्र शासनाकडून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये Direct Benefit Transfer ( DBT ) अंतर्गत जमा करण्यात येईल.
सदर योजनांची सविस्तर माहिती विश्व विद्यालय अनुदान आयोगच्या संकेतस्थळ – www.ugc.gov.in / केंद्र शासनाच्या National Scholarship Portal ( NSP ) पोर्टल (संकेतस्थळ – www.scholarships.gov.in ) वर देण्यात आलेली आहे.
सदर योजना केंद्र शासनाच्या National Scholarship Portal ( NSP ) पोर्टलद्वारे ( संकेतस्थळ – www.scholarships.gov.in ) ऑनलाईनरित्या राबविण्यात येते. सदर योजनेच्या लाभासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांनी नवीन ( Fresh ) व मागील शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या पात्र विद्यार्थ्यानी नुतनीकरणासाठी ( Renewal ) अर्ज NSP पोर्टलवर नमूद करण्यात आलेल्या अंतिम मुदतीच्या आत ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.