• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Pragati Scholarship Scheme

प्रगती शिष्यवृत्ती योजना

[ AICTE-Pragati Scholarship Scheme For Girl Students (Degree/ Diploma)]
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद़ेची मंजूरी असलेल्या संस्था व तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये ( पदविका, पदवी ) शिकणाऱ्या विद्यार्थिनीं साठी प्रगती शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे. सदर योजने करीता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (दोन्ही पालकांचे एकत्रित ) रुपये 8 लाखापर्यंतनिश्चित करण्यात आलेले आहे.सन 2020-21 पासून सदर योजनासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांना नोडल ऑफिस म्हणून घोषित करण्यात आले आहे.या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी केंद्र शासनाकडून खालीलप्रमाणे शिष्यवृत्तीचा संच निर्धारीत करण्यात आला आहे.

शिष्यवृत्तीचा नविन ( Fresh ) संच/कोटा ( Quota ) –

राज्य

अ क्र.

अभ्यासक्रम

संचसंख्या

महाराष्ट्र

1

पदविका

624

2

पदवी

553

शिष्यवृत्ती रक्कम-

.क्र.शिष्यवृत्तीचेघटकएक रक्कम ( Lump sum Amount )
संस्थेलादेयअसणारेशुल्क, संगणकस्टेशनरी, पुस्तके, यंत्रसामुग्री,  सॉफ्टवेअरइ.रु.50,000/- प्रतिवर्ष

सदर योजनांचीमंजुररक्कमकेंद्र शासनाकडून थेटविद्यार्थ्यांच्याबँकखात्यामध्येDirect Benefit Transfer ( DBT ) अंतर्गतजमाकरण्यातयेते.
सदर योजनांची सविस्तर माहिती अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या संकेतस्थळ –www.aicte-india.org / केंद्र शासनाच्या National Scholarship Portal ( NSP ) पोर्टल(संकेतस्थळ- www.scholarships.gov.in ) वर देण्यात आलेली आहे.

सदर योजना केंद्रशासनाच्याNational Scholarship Portal ( NSP ) पोर्टलद्वारे ( संकेतस्थळ –www.scholarships.gov.in) ऑनलाईनरित्या राबविण्यात येते. सदर योजनेच्या लाभासाठी चालू शैक्षणिक वर्षा मध्ये प्रथम वर्ष व थेट व्दितीय वर्षात नव्याने प्रवेशित विद्यार्थिनींनी नवीन ( Fresh ) व मागील शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या पात्र विद्यार्थिनींनी नुतनीकरणासाठी ( Renewal ) अर्ज NSP पोर्टलवर नमूद करण्यात आलेल्या अंतिम मुदतीच्या आत ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.