राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय, शासन अनुदानित (शासकीय अभिमत विद्यापीठासह), विनाअनुदानित (खाजगी अभिमत विद्यापीठे व स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) महाविद्यालये / तंत्रनिकेतनामध्ये सुरु असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सक्षम प्राधिका-यामार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (व्यवस्थापन कोटयातील /संस्था स्तरावरील प्रवेश वगळून ) प्रवेश घेणा–या आर्थिकदृष्टया मागास (EBC), आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग (SEBC) विद्यार्थ्यांसाठी“राजर्षीछत्रपतीशाहूमहाराजशिक्षणशुल्क शिष्यवृत्ती योजना” ( Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Shikshan Shulk Shishyavrutti Yojna ) लागू करण्यात आली आहे. सदर योजनेकरीता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (दोन्ही पालकांचे एकत्रित) रुपये 8.00 लाखापर्यंत निश्चित करण्यात आलेले आहे.
• शिष्यवृत्ती रक्कम – सदर योजनेंतर्गत विद्यार्थी ज्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत असेल, त्या अभ्यासक्रमाकरिता आकारण्यात येणारे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क रकमेच्या लाभ मुले / मुलींना खालील प्रमाणे देण्यात येतो. ( शै.वर्ष 2024 -25 पासून मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 100 टक्के लाभ लागू करण्यात आला आहे.)
अ. क्र.
प्रकार
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा
अभ्यासक्रम
विद्यार्थी
शैक्षणिक शुल्काच्या
परीक्षा शुल्काच्या
1
शिष्यवृत्ती
8 लाखा पर्यंत
व्यवसायिक
मुले
50 टक्के
50 टक्के
2
शिष्यवृत्ती
8 लाखा पर्यंत
व्यवसायिक
मुली
100 टक्के
100 टक्के
सदर योजनांची मंजुर रक्कम ( दोन हप्त्यांमध्ये, पहीला हप्ता हा ऑक्टोबर महीन्याच्या पहील्या आठवडया पर्यंत व उर्वरित दुसरा हप्ता फेब्रुवारी अखेरपर्यंत ) विद्यार्थ्यांना (त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये)/ संस्थाना डीबीटी पोर्टलद्वारे जमा करण्यात येते.
वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची पध्दत :-
1) संस्थेमध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी वरील योजनांचे ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र शासनाच्या महाडिबीटी पोर्टल (URL– https://mahadbt.maharashtra.gov.in) वर देण्यात आलेल्या युजर मॅन्युअल व सुचनांचे पालन करुन, डिबीटी पोर्टलवर दर्शविण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार संपुर्ण अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावे.