Last updated on सप्टेंबर 15th, 2025 at 11:58 am
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी टॉप क्लास एज्युकेशन शिष्यवृत्ती योजना
( Scholarship For Top Class Education for Students with Disabilities )
सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली तर्फे दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग यांचेमार्फत सन 2015-16 पासून दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाच्या योजनांतर्गत देण्यात आलेल्या यादीतील ( देशातील 375 संस्थापैकी 34 महाराष्ट्र राज्यातील संस्था ) संस्थांमध्ये उच्च शिक्षण ( पदवी व पदव्युत्तर पदवी /पदविका अभ्यासक्रम ) घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी टॉप क्लास एज्युकेशन शिष्यवृत्ती योजना ( Scholarship For Top Class Education for Students with Disabilities ) ही शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आलेली आहे.सदर योजनेकरीता दिव्यांगाचे प्रमाण 40 % किंवा त्यापेक्षा अधिक व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (दोन्ही पालकांचे एकत्रित ) रुपये 8.00 लाखा पर्यंत निश्चित करण्यात आलेले आहे.सदर योजनासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांना नोडल ऑफिस म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून राष्ट्रासाठी खालीलप्रमाणे शिष्यवृत्तीचा संच निर्धारीत करण्यात आला आहे.
शिष्यवृत्तीचा नविन ( Fresh ) संच/कोटा ( Quota ) –
अ.क्र. | केंद्र शासनाच्या योजनांतर्गत देण्यात आलेल्या यादीतील संस्था | संपूर्ण राष्ट्रासाठी – नविन ( Fresh ) आणि नुतनीकरण (Renewal ) चा एकत्रित संच/कोटा (Quota) | राज्यासाठी- नविन ( Fresh ) आणि नुतनीकरण (Renewal ) चा एकत्रित संच /कोटा (Quota) |
1. | 375 | 300 | 31 |
शिष्यवृत्ती रक्कम -
सदर योजनेंतर्गत नविन शिष्यवृत्ती ( पात्र व गुणवत्तेनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ) व नूतनीकरणासाठी आलेल्या पात्र विद्यार्थ्यांला खालील प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.
अ.क्र. | शिष्यवृत्तीचे घटक | रक्कम |
अ) | संस्था / विद्यापीठाला देय असलेले प्रवेश शुल्क व शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती | रु.1,90,000/- पर्यंत प्रति वर्ष ( वास्तविक रक्कमेच्या अधीन राहून ) |
ब) | संकीर्ण /विविध भत्ते | |
i) | ग्रंथालय शुल्क, क्रिडा शुल्क, वैद्यकीय परीक्षा आणि संस्था/विद्यापीठ/मंडळाचे देय असलेले इतर आवश्यक शुल्क | रु.10,000/- पर्यंत प्रति वर्ष ( वास्तविक रक्कमेच्या अधीन राहून ) |
ii) | संगणक / लॅपटॉप व त्यांच्या संबंधित सुटे भाग खरेदीच्या खर्चाची प्रतिपूर्ती | रु. 45,000/- पूर्ण अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात एकदाच देय. |
iii) | निवड झालेल्या उमेदवारांच्या विशिष्ट दिव्यांगासाठी आवश्यक असलेल्या सॉफ्टवेअरसह मदत व मदतीच्या साहित्याची खरेदीच्या खर्चाची प्रतिपूर्ती | रु. 30,000/- पूर्ण अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात एकदाच देय. |
क) | देखभाल /परिरक्षण भत्ता | रु. 3,000/- प्रति महिना वसतिगृहामध्ये राहणा-या विद्यार्थ्यांना, रु. 1,500/- प्रति महिना डे-स्कॉलर विद्यार्थ्यांना |
ड) | विशेष भत्ते ( दिव्यांगाच्या प्रकारानुसार त्या अनुषंगिक उदा.वाचन भत्ता, संरक्षण भत्ता, मदत भत्ता इ.) | रु. 2,000/-प्रति महिना. |
इ) | पुस्तक भत्ता | रु. 5,000/- प्रति वर्ष |
सदर योजनांची मंजुर रक्कम केंद्र शासनाकडून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये Direct Benefit Transfer ( DBT ) अंतर्गत जमा करण्यात येते.उपरोक्त योजनांची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या ( संकेतस्थळ – www.disabilityaffairs.gov.in ) / केंद्र शासनाच्या National Scholarship Portal ( NSP ) पोर्टल (संकेतस्थळ – www.scholarships.gov.in ) वर देण्यात आलेली आहे.
सदर योजना केंद्र शासनाच्या National Scholarship Portal ( NSP ) पोर्टलद्वारे ( संकेतस्थळ – www.scholarships.gov.in ) ऑनलाईनरित्या राबविण्यात येते. सदर योजनेच्या लाभासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांनी नवीन ( Fresh ) व मागील शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या पात्र विद्यार्थ्यानी नुतनीकरणासाठी ( Renewal ) अर्ज NSP पोर्टलवर नमूद करण्यात आलेल्या अंतिम मुदतीच्या आत ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.

