• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Statistical Information TEQIP

Last updated on जुलै 20th, 2022 at 03:03 pm

TEQIP

प्रशिक्षण

  1. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, (यशदा) पुणे
    यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, (यशदा) पुणे ही महाराष्ट्र शासनाची प्रशासकीय प्रशिक्षण संस्था आहे. संचालनालयाच्या अखत्यारीतील शासकीय संस्थांमधील अधिकारी आणि प्राध्यापकांसाठी यशदा येथे पायाभूत व उजळणी वर्ग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. सदर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या दरवर्षीच्या अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद केली जाते. वर्ष 2021-22 मध्ये आयोजित प्रशिक्षणातून लाभ घेतलेल्या प्रशिक्षणार्थींची माहिती खालील प्रमाणे आहे.
अ.क्र. आर्थिक वर्ष प्रशिक्षण कार्यक्रमांचे नाव प्रशिक्षणाचा कालावधी लाभ घेतलेल्या प्रशिक्षणार्थींची संख्या
1
2021-22
पायाभूत प्रशिक्षण
103
42 दिवस
उजळणी वर्ग प्रशिक्षण
05 दिवस
76
2
एकूण
179
  1. पदवी/पदविका अभ्यासक्रमाचा दर्जा सुधारणे या योजने अंतर्गत एक आठवडयाचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
    सध्याच्या परिस्थितीची गरज लक्षात घेऊन तंत्रशिक्षण संचालनालयाने पुढाकार घेऊन आपल्या अखत्यारीतील शासकीय पदवी/पदविका संस्थांमधील अध्यापकांसाठी एक आठवड्याच्या प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अर्थसंल्पात तरतूद केली आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रम अत्याधुनिक तंत्रज्ञान, अध्यापनशास्त्रीय कौशल्य आणि नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती वाढविण्याच्या उद्येशाने आयोजित केले जातात. वर्ष 2021-22 मध्ये आयोजित प्रशिक्षणातून लाभ घेतलेल्या प्रशिक्षणार्थींची माहिती खालील प्रमाणे आहे.
अ.क्र. आर्थिक वर्ष प्रशिक्षण कार्यक्रमांचे नाव 2021-22 मध्ये आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमांची एकूण संख्या प्रशिक्षणाचा कालावधी लाभ घेतलेल्या प्रशिक्षणार्थींची संख्या
1
2021-22
1 Week FDP
23
5 दिवस
837

तंत्रशिक्षणाचा दर्जा सुधार कार्यक्रम (TEQIP) (जागतिक बँक सहाय्य प्रकल्प)

प्रकल्पाचा पहिला टप्पा (TEQIP – I) प्रकल्पाचा दूसरा टप्पा (TEQIP – II) प्रकल्पाचा तिसरा टप्पा (TEQIP – III)
प्रकल्पाचा कालावधी
मार्च, 2003 – मार्च, 2009
2010-2017
2017-2022
प्रकल्पात सहभागी संस्थांची संख्या
14 अभियांत्रिकी lसंस्था (9 शासकीय, शासकीय अनुदानित, 5 अशासकीय विना अनुदानित)
17 अभियांत्रिकी संस्था (14 शासकीय, 3 शासकीय अनुदानित)
11 अभियांत्रिकी संस्था (4 शासकीय /7 शासकीय अनुदानित)+ 01 संलग्न तंत्रज्ञान विद्यापीठ

प्रकल्पाच्या प्रमुख उपलब्धी :

  • UGC ने 16 अभियांत्रिकी संस्थांना स्वायत्त दर्जा दिला.
  • राष्ट्रीय जर्नल्समध्ये ५१५ शोधनिबंध प्रकाशित झाले
  • आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये 1312 शोधनिबंध प्रकाशित झाले
  • 60 पेटंट प्राप्त झाले आणि 1097 पेटंट दाखल झाले.
  • 1500 प्राध्यापकांना विविध क्षेत्रात प्रशिक्षित केले.