[ AICTE-Swanath Scholarship Scheme for Students (Degree / Diploma)]
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद़ेची मंजूरी असलेल्या संस्था व तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये ( पदविका, पदवी ) शिकणाऱ्या अनाथ किंवा ज्या विद्यार्थ्याचे आई वडील दोघेही किंवा दोघांपैकी एक कोव्हिड-19 ने मृत्यू पावले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचे पालक सशस्त्र दल /केंद्रीय निमलष्करी दलांच्या कारवाईमध्ये शहीद झाले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी स्वनाथ शिष्यवृत्ती योजना सन 2021-22 पासून सुरू केलेली आहे. सदर योजनेकरीता कुटुंबाचे सर्व स्त्रोतांमार्फत मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये 8 लाखापर्यंत निश्चित करण्यात आलेले आहे. सदर योजनासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांना नोडल ऑफिस म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून राष्ट्रासाठी खालीलप्रमाणे शिष्यवृत्तीचा संच निर्धारीत करण्यात आला आहे.
शिष्यवृत्तीचा नविन ( Fresh ) संच/कोटा ( Quota ) –
अ क्र.
अभ्यासक्रम
संचसंख्या
1
पदविका
1000
2
पदवी
1000
शिष्यवृत्ती रक्कम-
सदर योजनेंतर्गत नविन शिष्यवृत्ती ( पात्र व गुणवत्तेनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ) व नूतनीकरणासाठी आलेल्या पात्र विद्यार्थ्यांला खालील प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.
अ.क्र.
शिष्यवृत्तीचेघटक
एक रक्कम ( Lump sum Amount )
अ
संस्थेला देय असणारे शुल्क, संगणक स्टेशनरी, पुस्तके, यंत्रसामुग्री, सॉफ्टवेअर इ.
रु.50,000/- प्रतिवर्ष
सदर योजनांची मंजुर रक्कम केंद्र शासनाकडून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये Direct Benefit Transfer ( DBT ) अंतर्गत जमा करण्यात येईल.
सदर योजनांची सविस्तर माहिती विश्व विद्यालय अनुदान आयोगच्या संकेतस्थळ – www.ugc.gov.in / केंद्र शासनाच्या National Scholarship Portal ( NSP ) पोर्टल (संकेतस्थळ – www.scholarships.gov.in ) वर देण्यात आलेली आहे.
सदर योजना केंद्र शासनाच्या National Scholarship Portal ( NSP ) पोर्टलद्वारे ( संकेतस्थळ – www.scholarships.gov.in ) ऑनलाईनरित्या राबविण्यात येते. सदर योजनेच्या लाभासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांनी नवीन ( Fresh ) व मागील शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या पात्र विद्यार्थ्यानी नुतनीकरणासाठी ( Renewal ) अर्ज NSP पोर्टलवर नमूद करण्यात आलेल्या अंतिम मुदतीच्या आत ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.