• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

User menu

Merit-Cum-Means

Last updated on सप्टेंबर 15th, 2025 at 11:53 am

गुणवत्ता - नि - साधन शिष्यवृत्ती योजना ( Merit-Cum-Means )

अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली तर्फे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी    गुणवत्ता -नि – साधन शिष्यवृत्ती योजना सन 2007-08 पासून सुरू केलेली आहे. सदर योजना मुस्लिम , बौद्ध, ख्रिश्चन, शीख , पारशी आणि जैन  या अल्पसंख्यांक समाजातील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये  (पदवी व पदव्युत्तर ) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता लागू करण्यात आलेली आहे.सदर योजनेकरीता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (दोन्ही पालकांचे एकत्रित )  रुपये 2.50 लाखा पर्यंत निश्चित करण्यात आलेले आहे. सदर योजनासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांना नोडल ऑफिस म्हणून घोषित करण्यात आले आहे.

.

शिष्यवृत्तीचा नविन ( Fresh ) संच/कोटा (Quota) -

धर्मनिहायनविन ( Fresh ) शिष्यववृत्तीचासंच कोटा

धर्म मुस्लीम बौध्द ख्रिश्चन शिख पारशी जैन एकूण
विदयार्थ्यी संख्या
3328
1676
277
57
12
359
5709

शिष्यवृत्ती रक्कम -

सदर योजनेंतर्गत नविन शिष्यवृत्ती ( पात्र व गुणवत्तेनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ) व नूतनीकरणासाठी आलेल्या पात्र विद्यार्थ्यांला खालील प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.

Sr.No. Type of Financial Assistance Rate for Hostler Rate for Day Scholar
1.
Maintenance Allowance (For 10 months only)
Rs.10,000/-per annum ( Rs.1000 p.m.)
Rs.5,000/- per annum. ( Rs.500 p.m.)
2.
Course Fee*
Rs.20,000/- per annum or Actual whichever is less
Rs.20,000/- per annum or Actual whichever is less
Total
Rs.30,000/-
Rs.25,000/-

* Full course fee will be reimbursed for eligible institutions listed at Annexure‐III .

                  सदर योजनांची मंजुर रक्कम केंद्र शासनाकडून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये Direct Benefit Transfer ( DBT )  अंतर्गत जमा करण्यात येते. उपरोक्त योजनांची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या  अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाच्या  संकेतस्थळ www.minorityaffairs.gov.in) / केंद्र शासनाच्या National Scholarship Portal ( NSP ) पोर्टल (संकेतस्थळ – www.scholarships.gov.in  ) वर देण्यात आलेली आहे.

सदर योजना केंद्र शासनाच्या National Scholarship Portal ( NSP ) पोर्टलद्वारे ( संकेतस्थळ –www.scholarships.gov.in ) ऑनलाईनरित्या राबविण्यात येते. सदर योजनेच्या  लाभासाठी प्रवेशित  विद्यार्थ्यांनी नवीन ( Fresh ) व मागील शैक्षणिक वर्षात  शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या पात्र विद्यार्थ्यानी नुतनीकरणासाठी ( Renewal ) अर्ज NSP पोर्टलवर नमूद करण्यात आलेल्या अंतिम मुदतीच्या आत ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.