• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department
Directorate of Technical Education, Maharashtra State
तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य

Scholarship for students of minority communities pursuing Higher and Professional courses

Last updated on जुलै 22nd, 2024 at 03:08 pm

उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती योजना (भाग - 1 वैद्यकिय अभ्यासक्रम वगळून )

अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गुणवत्ताधारक व तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण ( पदविका, पदवी व पदव्युत्तर ) घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती योजना सन 2008-09 पासून लागू करण्यात आली आहे. सदर योजनेकरीता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (दोन्ही पालकांचे एकत्रित ) रुपये 8.00 लाखा पर्यंत निश्चित करण्यात आलेले आहे. सदर योजनेकरीता विदयार्थ्यांने माध्यमिक शालांत परिक्षा ( एस एस सी ) महाराष्ट्र राज्यातुन उत्तीर्ण केलेलीअसावी.
शिष्यवृत्तीरक्कम
सदर योजनेंतर्गत नविन शिष्यवृत्ती व नूतनीकरणासाठी आलेल्या पात्र अल्पसंख्यांक विद्यार्थी ज्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत असेल, त्या अभ्यासक्रमाकरिता आकारण्यात येणारे प्रत्यक्ष वार्षिक शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क किंवा रुपये 50,000/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येते.
सदर योजनांची मंजुर रक्कम विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये डीबीटी पोर्टलद्वारे जमा करण्यात येते.

वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची पध्दत :-

1) संस्थेमध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी वरील योजनांचे ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र शासनाच्या महाडिबीटी पोर्टल (URL – https://mahadbt.maharashtra.gov.in) वर देण्यात आलेल्या युजर मॅन्युअल व सुचनांचे पालन करुन, डिबीटी पोर्टलवर दर्शविण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार संपुर्ण अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावे.
2) ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नंबर मोबाईल नंबरशी संलग्नीत नाहीत त्यांनी जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आपले आधार कार्ड नंबर मोबाईल नंबरशी संलग्न करुन घ्यावे.